शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
2
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
3
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
4
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
5
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
6
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
8
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
9
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
10
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
11
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
12
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
13
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
14
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
16
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
17
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
18
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
19
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
20
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

केंद्राने दिलेले अनुदान राज्य शासनाने अडकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 3:19 PM

केंद्र सरकारने चंदन व औषधी वनस्पती, रोपवाटिका लागवडीसाठी अनुदान देऊनही राज्य सरकारने दोन वर्षांपासून राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे अनुदान अडकविले आहे.

विनोद गोळेपारनेर : केंद्र सरकारने चंदन व औषधी वनस्पती, रोपवाटिका लागवडीसाठी अनुदान देऊनही राज्य सरकारने दोन वर्षांपासून राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे अनुदान अडकविले आहे. हा प्रकार शेतकऱ्यांनी थेट दिल्लीतील अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर उघड झाला.राज्यामध्ये विदर्भात पान पिंपरी, शतावरी औषधी वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. चंदन शेतीही राज्यातील इतर भागात होते. रोपवाटिकेचे क्षेत्रही वाढत आहे. यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून हेक्टरी ५८ हजार रूपयांचे चंदन झाडे व इतर औषधी वनस्पतींसाठी अनुदान देण्यात येते. मात्र दोन वर्षांपासून (२०१७-१८, २०१८-१९) राज्यातील कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राज्यातील तीन हजार शेतकºयांचे अनुदान अडकले आहे. राज्यातील शेतकºयांनी नुकतीच दिल्ली येथे आयुष मंत्रालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी तनुजा मिस्त्री यांची भेट घेतली. त्यांनी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे शेतकºयांचे अनुदान वर्ग केल्याची माहिती दिली. त्यानंतर अनिल बांडे यांच्याकडे कृषीमंत्री पदाचा कार्यभार आला. त्यानंतर दर्यापूरचे आमदार रमेश बुंदीले, पारनेर येथील राजेंद्र गाडेकर, सरपंच सुरेश बोरूडे, विष्णू दरेकर, अमरावतीचे कमलकांत लांडोळे, सुभाष थोरात, विजय लांडोळे, जयश्री चित्रे, ज्योती लोहोकरे यांनी कृषीमंत्री बांडे यांची भेट घेतली होती. त्यांना हा प्रकार शेतकºयांनी सांगितला.पारनेरच्या शेतक-यांचा लढाचंदन शेती व औषधी वनस्पती लागवडीसाठी केंद्र सरकार अनुदान देते. याची माहिती पारनेर तालुक्यातील पिंपळनेर, राळेगणसिद्धीचे शेतकरी राजेंद्र गाडेकर यांनी मिळवली. त्यांनी सखोल माहिती घेतल्यावर दोन वर्षांपासून अनुदान रखडले असल्याचे लक्षात आले. त्यांचा अनुदानासाठी लढा सुरू आहे.आम्हाला हा प्रकार बैठकीत लक्षात आला आहे. कृषी विभागातील अधिका-यांना राज्यातील सर्व शेतक-यांचे प्रस्ताव तपासणी करून अनुदान त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. -अनिल बांडे, कृषी मंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयParnerपारनेर