नगर दक्षिणेतून प्रसंगी अपक्ष लढण्याचे सुजय विखेंचे सूचक वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:14 PM2018-02-23T23:14:25+5:302018-02-23T23:15:40+5:30

पक्षाच्या बाहेर जाऊन आपण जनतेच्या कामाला प्राधान्य देतो. ‘जनसेवा’ संघटनेचे कार्यकर्ते प्रसंगी ‘सायकल’ हाती घेऊन जनतेचे काम करतील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी रात्री पाथर्डीत गेले.

Statement of Sujay Vikhe's statement to contest independently from nagar south | नगर दक्षिणेतून प्रसंगी अपक्ष लढण्याचे सुजय विखेंचे सूचक वक्तव्य

नगर दक्षिणेतून प्रसंगी अपक्ष लढण्याचे सुजय विखेंचे सूचक वक्तव्य

पाथर्डी : पक्षाच्या बाहेर जाऊन आपण जनतेच्या कामाला प्राधान्य देतो. ‘जनसेवा’ संघटनेचे कार्यकर्ते प्रसंगी ‘सायकल’ हाती घेऊन जनतेचे काम करतील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी रात्री पाथर्डीत गेले. त्यांच्या या वक्तव्याला माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी ‘सायकल’ चिन्ह घेऊन अपक्ष लढविलेल्या निवडणुकीचा संदर्भ असल्याचे मानले जात आहे.
डॉ. सुजय यांनी पाथर्डीत ‘जनसेवा’ या आपल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले, मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी नेता नसून कार्यकर्ता आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मेंदूचा डॉक्टर आहे. पन्नास वर्षाच्या कालावधीत विखे कुटुंबीयांनी स्वच्छ राजकारण व समाजकारण केले. आमच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही.
जनतेसाठी कुठलीही तडजोड आम्ही करत नाही. पाथर्डीच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीने सातत्याने चुका केल्या. भाजपा सदैव चुकत आहे, तर सेना सुधारायला तयारच नाही. त्यामुळे जनता वाºयावर आहे. मी पक्ष न पाहता जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून काम करणार आहे. जनसेवेचे कार्यकर्ते जनतेसाठी ‘सायकल’ देखील हाती घेतील, असे ते म्हणाले.
१९९१ साली बाळासाहेब विखे यांनी ‘सायकल’ चिन्ह घेऊन नगर दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे सुजय यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्राच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी अरुण आठरे, मोहन पालवे, भाऊसाहेब राजळे, काशीनाथ लवाडे, संभाजी वाघ, गहिनीनाथ थोरे, नासीर शेख, सहदेव शिरसाठ,
शंकरराव पालवे, बंडूशेठ बोरुडे, अजय रक्ताटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय रक्ताटे यांनी तर आभार बंडूशेट बोरुडे यांनी मानले.

विखेंकडून बदलाचे सूचक विधान

डॉ. सुजय विखे यांचे भाषण सुरु होताच खाली बसलेल्या कार्यकर्त्याने हाताचा पंजा... पंजा असे ओरडून सांगितले. त्यावेळी सुजय विखे यांनी थोडा बदल आहे, असे व्यासपीठावरून सूचक विधान केले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

पक्षापेक्षा जनतेला महत्त्व

नगर तालुक्यात चिचोंडी पाटील येथेही विखे यांचा मेळावा झाला. तेथील सभेत विखे यांनी भाजप व कॉंग्रेसकडून लोकसभा लढवावी, अशी मागणी आपल्या भाषणात अनुक्रमे भाजपचे मनोज कोकाटे व कॉंग्रेसचे विनायक देशमुख यांनी केली. यासंदर्भात बोलताना आपण कुठल्याही पक्षापेक्षा जनतेला महत्त्व देतो, असे सुजय म्हणाले.

Web Title: Statement of Sujay Vikhe's statement to contest independently from nagar south

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.