--------------
वेतनवाढीसाठी कर्मचारी आक्रमक
अहमदनगर : अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत संपली असताना नवीन करार करून महागाई निर्देशांकानुसार ८ ते १२ हजार रुपयांपर्यंत वेतनवाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकरण सहायक कामगार आयुक्तांकडे गेले असताना तारखेला हजर न राहता एकूण वेतनाच्या फक्त ७ टक्के वेतनवाढ करण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या ट्रस्टच्या विरोधात लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अरणगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकीत गुरुवारी (दि. १७) सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीसाठी भाकपचे राज्य सहसचिव अॅड. कॉ. सुभाष लांडे, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनील दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचरणे, सुनीता जावळे, बबन भिंगारदिवे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------
मुंडे जयंतीनिमित्त वृक्षारोपण
अहमदनगर : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पारिजात चौक ते बीएसएनएल कार्यालय रस्त्याच्या दुतर्फा १० फूट उंचीची झाडे लावण्यात आली. नगरसेवक रामदास आंधळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका संगीता खरमाळे, मेजर शिवाजी पालवे, सुधीर पोटे, मदन पालवे, दीपक कावळे, राहुल आंधळे, कैलास गर्जे, दीपक कावळे, शिरीष जानवे, अभिजित चिप्पा, ऋग्वेद गंधे, संतोष हारेर, सुरेश सानप, पोपट पालवे, वैभव आव्हाड, हर्षल बांगर, स्वप्नील नांगरे, आनंद नाकाडे, आकाश सोनवणे आदींची उपस्थिती होती.