शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

राज्यातील पहिला अद्भूत प्रकल्प राहुरीत साकारणार; सरकारची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 2:49 PM

या प्रकल्पाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. विशेष या प्रकल्पात अवघ्या ५० हजार रुपयात घर मिळणार आहे, अशी माहिती राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

ठळक मुद्देबेघरांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व सोयीसुविधांनीयुक्त असणारा राज्यातील पहिला भव्य गृहप्रकल्प राहुरीत साकारणार आहे.दोन एकरापेक्षा जास्त जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यामध्ये २१० घरे बांधण्यात येणार आहेत.तीनशे स्क्वेअरफुट बांधकाम असलेल्या घरामध्ये दोन रुम असतील. प्रत्येक लाभार्थीसाठी तीन लाख रूपये खर्च येणार आहे. त्यामध्ये ५० हजार रूपये लाभार्थिंनी भरावयाचे आहेत.

राहुरी : बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व सोयीसुविधांनीयुक्त असणारा राज्यातील पहिला भव्य गृहप्रकल्प राहुरीत साकारणार आहे. दोन एकरापेक्षा जास्त जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यामध्ये २१० घरे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. विशेष या प्रकल्पात अवघ्या ५० हजार रुपयात घर मिळणार आहे, अशी माहिती राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली.राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात वसाहत उभी रहावी, अशी युवकांची मागणी होती़ त्यानुसार तत्कालीन नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांनी राहुुुुरी नगर परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला होता. नगर परिषदेने प्रकल्पाचा आराखडा शहर नियोजन विभागाकडे पाठविला होता. इंजिनिअर प्रमोद कर्डिले व मोटे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला.रमाई आवासा योजनेतून हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. सर्व्हे नंबर ४२२ मध्ये तीन मजली इमारतीमध्ये २१० घरे बांधणार असल्याचे नगराध्यक्ष तनपुरे यांनी सांगितले. तीनशे स्क्वेअरफुट बांधकाम असलेल्या घरामध्ये दोन रुम असतील. एक रेशनकार्ड धारकाला एक घर देण्याचे नियोजन आहे. प्रत्येक लाभार्थीसाठी तीन लाख रूपये खर्च येणार आहे. त्यामध्ये ५० हजार रूपये लाभार्थिंनी भरावयाचे आहेत. नियोजित वसाहतीमुळे अरूंद रस्ते असलेल्या लक्ष्मीनगर भागातील नागरीकांना हक्काचे घर मिळणार आहे, असे माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांनी सांगितले.बहुमजली इमारतीसाठी शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचा नगरसेवक सोन्याबापू जगधने, प्रकाश जगधने, ज्ञानेश्वर जगधने यांनी सत्कार केला़ यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, नगरसेवक भिकूशेठ भुजाडी, अशोक आहेर, अनिल कासार, नंदकुमार तनपुरे, रमेश चौधरी, रावसाहेब तनपुरे, बाळासाहेब उन्डे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी