जामखेड : बंद पडलेले उडीद खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील शेतक-यांनी खर्डा चौकात शुक्रवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले.जामखेड बाजार समितीत हमी भावाने उडीद खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. मात्र, हे खरेदी केंद्र सध्या बंद आहे. त्यामुळे हे उडीद खरेदी केंद्र पुन्हा सुरु करावे, या मागणीसाठी शेतक-यांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार मोहोळकर यांनी आंदोलकर्त्यांशी चर्चा केली़ मोहोळकर यांनी पणन महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांना तातडीने जामखेडमध्ये बोलावून खरेदी केंद्राबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन शेतक-यांना दिले. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.या आंदोलनात श्रीकृष्ण लांडे, महेष गर्जे, अंकुश खोटे, शिवाजी खोटे, शिवाजी लांडे, बंडू खाडे, रावसाहेब शेंडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उडीद खरेदी केंद्रासाठी जामखेडमध्ये शेतक-यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:09 PM