उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमाेल निकम यांना निवेदन देण्यात आले. खांडगाव शिवारातून वाहणाऱ्या प्रवरा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करत विविध वाहनांमधून वाळू वाहतूक करण्यात येते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. खांडगाव शिवारातून होणारा अवैधरीत्या वाळू उपसा व वाळू वाहतूक थांबवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर अनेक ग्रामस्थांची नावे आहेत.
--------------
तरुणाने मांडली व्यथा
सोशल मीडियात एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा तरुण आपली व्यथा मांडताना त्यात दिसतो आहे. वाळू तस्करांवर प्रशासनाचा कुठलाही वचक राहिला नसल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. गावात २५ ते ३० ट्रॅक्टर रोज रात्रं-दिवस चालू असतात. त्या त्रासाने ग्रामस्थांना रात्रभर झोप नाही. प्रशासनाला वेळोवेळी कळवूनही कुठलीही कारवाई होत नाही. अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूक याकडे प्रशासन कानाडोळा करत आहे. वाळू तस्करांना वरदहस्त कुणाचा? असा प्रश्न देखील या तरुणाने उपस्थित केला आहे.
-----------
अवैधरीत्या होणारा वाळू उपसा व वाळू वाहतूक यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते आहे. खांडगाव शिवारातील नदीपात्राकडे जाणारे रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत. खांडगाव येथे मंडलाधिकारी, तलाठी व पोलीस पाटील या महिला आहेत. ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या समन्वयातून अवैधरीत्या वाळू उपसा रोखणार आहोत, त्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे आहे.
डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी, संगमनेर उपविभाग, संगमनेर
------------
खांडगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रातून होणारा अवैधरीत्या वाळू उपसा बंद व्हावा, याकरिता खांडगाव ग्रामपंचायतीमध्ये ठराव करण्यात आला. वाळू उपसा रोखण्याकरिता उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम यांना निवेदन देण्यात आले.
- भरत भिमाशंकर गुंजाळ, सरपंच, खांडगाव, ता. संगमनेर.
...........
फोटो : १५ खांडगाव आंदोलन,
ओळ : वाळू उपसा थांबवावा, या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमाेल निकम यांना देण्यात आले.