केडगाव : अहमदनगर-पुणे महामार्गावर चास येथे शेतक-यांनी दूधाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी रास्ता रोको करत दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. भरत पाटील, दीपक कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला.दूधाला पाच रुपये दर वाढ मिळावी या मागणी साठी नगर तालुक्यातील चास, निमगाव वाघ, भोरवाडी, अकोळनेर येथील शेतक-यांनी अहमदनगर-पुणे महामार्गावर चास येथे रास्ता रोको आंदोलन केला. दूध रस्त्यावर ओतून फडणवीस सरकारचा निषेध केला. या आंदोलनासाठी पंचायत समिती सभापती रामदास भोर उपस्थित होते. सध्या अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी दूध दर वाढीसाठी आग्रही राहावे. दूध दरवाढ मिळवण्यासाठी सरकारला भाग पडावे. या आंदोलनात सर्व सामान्य शेतकरी आहे. तरी पोलीस प्रशासनांनी यांच्यावर गुह्ने दाखल करू नये. दोन दिवसांनी जर दूध दरवाढ मिळाली नाही तर जेल भरो आंदोलन करणार असल्याचे भोर यांनी यावेळी सांगितले. पंधरा मिनट चाललेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात भगवान भोर, दादासाहेब ठाणगे, अशोक कापसे सह दूध उत्पादक शेतकरीमोठ्या संख्येने उपस्थित होते.
दूध दरवाढीसाठी अहमदनगर- पुणे महामार्गावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:48 PM
अहमदनगर-पुणे महामार्गावर चास येथे शेतक-यांनी दूधाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी रास्ता रोको करत दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. भरत पाटील, दीपक कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला.
ठळक मुद्दे रस्त्यावर दूध ओतून सरकारचा केला निषेध