अकोले : भंडारदरा धरणातून लाभक्षेञासाठी सुरू असलेले शेतीचे आवर्तन शनिवारी बंद झाले. २४ दिवस चाललेल्या या आवर्तनात ३ हजार २०० दलघफू पाणी वापरात आले. भंडारदरा धरणात १ हजार ७११ दलघफू पाणी शिल्लक आहे. २३ एप्रिल रोजी भंडारदरा धरणातून सिंचनासाठी १ हजार ७०० क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले. आवर्तन सुरू होताना भंडारदरा धरणात ४ हजार ४९८ दलघफू पाणीसाठा होता, तर निळवंडेत ७०३ दलघफू पाणी होते. २४ दिवस चाललेल्या आवर्तनासाठी भंडारदरा जलाशयातून ३ हजार २०० दलघफू पाणी खर्ची पडले. आता निळवंडेत २९० दलघफू, तर भंडारदरा धरणात १ हजार ७११ दलघफू पाणी शिल्लक असून राजूर पाणीपुरवठा योजनेसाठी भंडारदर्यातून निळवंडेत काही प्रमाणात पाणी सोडले जात आहे. राजूर योजनेच्या विहिरीपर्यंत पाणीसाठा निळवंडेत झाल्यानंतर चार दोन दिवसांनी भंडारर्याची मोरी बंद होणार आहे. निवडणुकी मुळे आवर्तनाकडे लक्ष गेले नसले तरी दिर्घकाळ चाललेल्या आवर्तनामुळे लाभक्षेञातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. आढळा मध्यम प्रकल्पात आजअखेर १७४ दलघफू पाणीसाठा असून बुडित क्षेञाबरोबरच हिवरगाव, डोंगरगाव, पाचगाव पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी राखून ठेवण्यात आल्याचे समजते. सलग पाच वर्षे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही, तसेच आढळा खोर्यातील भूजल पातळी खोल गेल्यामुळे आवर्षणप्रवण क्षेञ दुष्काळाच्या झळा सोसत आहे. माञ पिंपळगाव निपाणी, विरगाव, गणोरे, हिवरगाव भागातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात शेततळे केल्याने शेतीतील फळबागांना चांगला लाभ होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
भंडारदरा धरणाचे उन्हाळी आवर्तन बंद
By admin | Published: May 18, 2014 11:25 PM