जामखेड : जामखेड शहर व तालुक्यात काल सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार वादळवा-यासह मृगाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे छावणीतील जनावरांचे छत उडून गेले आहेत तर अरोळे झोपडपट्टी येथे घरावरील पत्रे उडून वयस्कर महिला जखमी झाली. काल सायंकाळी जोरदार वादळीवारे व विजेचा कडकडाटसह पावसाने हजेरी लावली. जोरदार वादळामुळे जामखेड येथील झोपडपट्टीवर राहणारे छगन निमोणकर व आशाबाई निमोणकर हे वयोवृद्ध दाम्पत्य घरात असताना छतावरील पत्रे उडाले. त्यातील एक पत्रा आशाबाई यांना लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. तसेच चारा छावण्यावर जनावरे बांधलेल्या ठिकाणाचे छत उडून गेले तसेच वाटप केलेला ओला चारा व पशुखाद्य भिजले त्यामुळे अनेक जनावरे मालकांनी जनावरे घरी घेऊन गेले.
जामखेड तालुक्यात वादळवा-यासह पाऊस, घरावरील पत्रे उडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:16 AM