भाजपा कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात शहराध्यक्ष मारुती बिंगले, तालुकाध्यक्ष बबन मुठे, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, उत्तर नगर सरचिटणीस सुनील वाणी आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात मोठी घोषणाबाजी केली. सरकारला ओबीसी समाजाचे काही घेणे देणे नाही. केवळ भाजपाचा जनाधार असल्याच्या आकसापोटी सरकारने न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच हे राजकीय आरक्षण फेटाळण्यात आले. ओबीसीवर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात समाजाच्या मागे खंबीरपणे उभे असून अन्यायाविरोधात संघर्ष करीत राहील. ओबीसीचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही. तोपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा दिला.
यावेळी ज्येष्ठ नेते सुनील मुथ्था, मारुती बिंगले, बबन मुठे, गणेश राठी, सतीश सौदागर, प्रफुल्ल डावरे, शरद बेळे आदींची भाषणे झाली. आंदोलनास उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, राम तरस, ज्येष्ठ नेते सुनील मुथ्था, उत्तर नगर जिल्हा सचिव अनिल भनगडे, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, दत्तात्रय देवकाते, श्रेयस झिरंगे, सुरेश बडजाते, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, माजी सरपंच भरत साळुंखे, बापू वडितके, अजित बाबेल, राजेंद्र कांबळे, मच्छिंद्र हिंगमिरे, ओबीसी शहराध्यक्ष प्रवीण बोराडे, चंद्रकांत परदेशी, मिलिंद साळवे, अरुण धर्माधिकारी, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा संयोजक विठ्ठल राऊत, सांस्कृतिक आघाडीचे बंडुकुमार शिंदे, औद्योगिक आघाडीचे जिल्हा संयोजक सुनील चंदन, युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, विशाल यादव, रूपेश हारकल, राहुल आठवल, दीपक मिसाळ, विजय आखाडे, विशाल अंभोरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनानंतर तहसीलदार प्रशांत पाटील व पोलीस निरीक्षक संजय सानप यांना निवेदन देण्यात आले.