विद्यार्थी हा देशाचा कणा असून तो घडविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ती जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडून सर्वांगसुंदर विद्यार्थी घडवावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी शिंदे यांनी केले. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी झाला असला तरी काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून विद्यार्थी घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने आपल्याला करावे लागणार आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कलगुंडे यांनीही शिक्षकांना पालकांचे प्रबोधन करून ऑनलाईन पद्धतीने व गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असेही सूचित केले. यावेळी आर. व्ही. जाधव, पिंप्री कोलंदर केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष बोरगे, मुख्याध्यापिका नंदा ठुबे, संजय ओहोळ, गवराम आढाव, मंगल मापारी, सुशिला कांडेकर, अलका भागवत, सईदा चौगुले, अरुणा ढुस आदी उपस्थित होते.
...................
१५ ढवळगाव प्रवेश
फोटो : पहिलीत प्रवेश घेतलेल्या मयूर पंकज गणवीर या विद्यार्थ्याचे गुलाब पुष्प व बिस्कीट पुडा देऊन स्वागत करताना गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे. समवेत ज्ञानेश्वर कलगुंडे, आर. व्ही. जाधव, सुभाष बोरगे, नंदा ठुबे आदी.