शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

सर्व्हर बंद असल्याने विद्यार्थी-पालकांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:37 PM

राज्यातील अभियांत्रिकीसह, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचे निकाल जाहीर झाले असले तरी आता पुढील प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अहमदनगर : राज्यातील अभियांत्रिकीसह, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचे निकाल जाहीर झाले असले तरी आता पुढील प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कारण गेल्या तीन दिवसांपासून या प्रवेश प्रक्रियेसाठी असलेले सर्व्हर बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.बारावीच्या निकालानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचा निकाल जाहीर झाला. या सीईटीत मिळालेल्या गुणांच्या आधारे व्यावसायिक पदवीअभ्यासक्रमाची आॅनलाईन नोंदणी व शैक्षणिक कागदपत्र पडताळणीसाठी जिल्ह्यात तेरा महाविद्यालयांत सेतू केंद्र उपलब्ध करून देण्यात आले. परंतु गेल्या तीन दिवसांपासून एकदम आलेला भार सहन न होऊन हे सर्व्हर वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे लांबून आलेल्या विद्यार्थी व पालकांचे प्रचंड हाल होत आहेत. काही विद्यार्थी-पालक तर बारा-बारा तास सर्व्हची वाट पाहत बसत आहेत. सीईटी सेलकडून यासंबंधीची माहिती वेळेवर विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचत नसल्याने विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे विद्यार्थी व पालकांचे म्हणणे आहे.दरम्यान, गुरूवारी सीईटी सेलने एक निवेदन प्रसिद्ध करत हे सर्व्हर २२ जूनपासून सुरळीत सुरू होईल, असे कळवले आहे.मुलांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने आम्ही सुट्या घेऊन येत आहोत. गेल्या तीन ेिदवसांपासून मी गेवराईवरून येत आहे. पण रोजच सर्व्हर डाऊन असल्याचे ऐकायला मिळते.- लक्ष्मीकांत शिर्के, पालकया सर्व्हर डाऊनमुळे काम तर काही होत नाही, परंतु काम करण्यापेक्षा पालकांना उत्तरे देण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांनाही त्रास सहन करावा लागतोे. - डॉ. हेमंत जाधव, शिक्षकतीन दिवसांपासून रोज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येत आहे. परंतू सर्व्हर डाऊन असल्याने रोज हेलपाटे मारावे लागतात.- स्नेहल शेळके, विद्यार्थिनी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय