महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा ५२ वा वर्धापन दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना रसाळ बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी महावीरसिंग चव्हाण उपस्थित होते. यावेळी हळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मिलिंद अहिरे उपस्थित होते.
मिलिंद अहिरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी समाजाच्या विकासासाठी कष्ट करण्याची सामाजिक बांधिलकी ठेवली पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येकाने आपले काम तन, मन, धन लावून केले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाला यश नक्की मिळते व आपल्या कामाचे समाधान होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामात कधीही हलगर्जीपणा करू नये. यावेळी अहिरे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेची सर्व माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी सखेचंद अनारसे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. कीर्ती भांगरे यांनी केली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या महेश जाधव, मंजिरी पाटील व संचिता नवले या स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला चारुदत्त चौधरी, मनोज गूड, प्रेरणा भोसले, अमृता सोनवणे उपस्थित होते.