शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला पाच ऑक्सिजन मशीनचे वितरण तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड, डॉ. तौफिक शेख, डॉ. जयश्री वमने यांनी या मशीनचा स्वीकार केला. शिक्षक समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राला दोन मशीनचे वितरण नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरपालिका रुग्णालयाचे डॉ. सचिन पर्हे, डॉ. मुंदडा यांना मशीन सुपुर्द करण्यात आल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अल्तमश पटेल, केतन खोरे,नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे उपस्थित होते.
जिल्हा परिषद व नगरपालिका शिक्षकांच्या वतीने तसेच काही निवृत्त शिक्षक बंधू - भगिनीनीं हा निधी दिला. निधी संकलन करण्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोलाचे परिश्रम घेतले आणि अवघ्या दोन दिवसात एवढा मोठा निधी निर्माण करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. याबद्दल तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---
फोटो ओळी : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सुपुर्द करण्यात आले.