महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यापीठ शास्त्रज्ञ सुसंवाद बैठकीला मार्गदर्शन करताना कदम बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी. पाटील होते. याप्रसंगी फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, आमदार लहू कानडे उपस्थित होते.
कदम म्हणाले, सध्याचे हवामान बदल लक्षात घेता, कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, सध्याची स्थिती लक्षात घेता सेंद्रिय शेतीच्या संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी संशोधन बाबींवर पेटंटसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले संशोधन हे उच्च दर्जाच्या जर्नल्समध्ये प्रकाशित करावे, असे ते म्हणाले. याप्रसंगी कुलगुरू डॉ.पी.जी. पाटील यांनी विद्यापीठाचा आढावा सादर केला. पाटील यांच्या हस्ते अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री निधीसाठी कृषी राज्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला. प्रास्ताविक संशोधन संचालक डॉ.शरद गडाख यांनी केले. कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ.भगवान देशमुख यांनी केले.
280821\img-20210828-wa0038.jpg
कृषि पंढरी म्हणुन ओळखल्या जाणार्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाला भरीव निधी दिला जाईल
- कृषि राज्यमंत्री मा. ना. डॉ. विश्वजीत कदम