या स्पर्धेत जगभरातील ५५ संघ सहभागी झाले होते. यात भारताकडून कुलकर्णी याने संघप्रमुख म्हणून काम पाहिले. त्याच्या संघात म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, सिंगापूर आदी देशांतील स्पर्धकांचा समावेश होता. कुलकर्णी व संघाला ‘ऑटेमेटेड ऍनिमल आयडेनटीफीकेशन ॲण्ड डेटेक्शन ऑफ स्पेसीज’ म्हणजेच एखाद्या फोटोवरून माशे व त्यांचे प्रकार ओळख करणे, असा स्पर्धेतील प्रकार होता. उत्तम सादरीकरण केल्याने त्यांना द्वितीय क्रमांकाचे पारिताेषिक मिळाले. बिडवे संघप्रमुख म्हणून असलेल्या संघाला ‘प्रेडिक्शन ऑफ ऑईल स्पिल्ल्स ईव्हेनट्स अँट सी’ म्हणजेच समृद्रातील पाण्याचे तेलामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी उपाय. असा स्पर्धेतील प्रकार होता. यात संघप्रमुख काम करणाऱ्या बिडवे यांना आपल्या संघाला उत्तेजनार्थ पारिताेषिक मिळवून दिले.
विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजयाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. वेंकटेश, संगणक विभागप्रमुख प्रा. राहुल पाईकराव, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदींनी कौतुक केले.