अहमदनगर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतर्गत होणा-या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी २३ वर्षाखालील पाँडेचेरी क्रिकेट संघात नगरच्या यश अविनाश जाधव याची निवड झाली आहे़. यशने पहिल्याच सामन्यात पाँडेचेरीकडून ३९ धावांची तडाखेबंद खेळी साकारली़. यश जाधव हा मधल्या फळीतील फलंदाज व यष्टीरक्षक आहे़. पाँडेचेरी संघाकडून खेळणारा नगरमधील यश हा पहिलाच खेळाडू आहे़. यश जाधव हा नगरमधील हुंडेकरी स्पोर्ट अकॅडमीचा खेळाडू आहे़. त्याला मुंबई रणजी संघाचे माजी कर्णधार अभिषेक नायर, रणजीपटू भाविन ठक्कर, हुंडेकरी अकॅडमीचे प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाले यांचे मार्गदर्शन लाभले़. हुंडेकरी स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष वसीम हुंडेकरी यांनी यश जाधवच्या निवडीचे स्वागत केले़.नायर यांच्या मार्गदर्शनामुळे यशला पाँडेचेरीकडून खेळण्याची संधी मिळाली़ गुरुवारी (दि़३१) पाँडेचेरी विरुद्ध सिक्कीम यांच्यात सामना झाला़. यशचा हा पहिलाच सामना होता़. या सामन्यात यशने उत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवित ३८ चेंडूत ३९ धावा फटकावताना ५ चौकार व १ षटकार मारला़. तसेच यष्टीमागे झेल घेऊन एक बळीही मिळविला़.
नगरचा यश जाधव पाँडेचेरी क्रिकेट संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 12:28 PM