संगमनेर : माहेश्वरी कनिष्ठ महिला मंडळाच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शारदा शिक्षण संस्थेच्या मातोश्री रु. दा. मालपाणी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेत यश संपादन केले.
३ ते ६ वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राष्ट्रगीत गायन स्पर्धेत आराध्या अमोल सस्कर (इयत्ता दुसरी) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. खुल्या गटातील १३ वर्षांपुढील देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत शिक्षक अंबादास बापूराव बुलाखे यांनी प्रथम, तर शिक्षिका शकुंतला विलास शेलार यांनी तृतीय क्रमांक मिळविला. अध्यक्षा सुवर्णा मालपाणी, सचिव सतीश लाहोटी, खजिनदार कृष्णकुमार बूब, सहसचिव शोभा पोफळे, संगमनेर माहेश्वरी कनिष्ठ महिला मंडळ, मुख्याध्यापिका रंजना राहणे, पर्यवेक्षक मच्छिंद्र हापसे यांनी कौतुक केले.