निंंबळक : राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या परीक्षेत पूनम विजय भांड, समृद्धी संतोष पवार व अस्मिता रवींद्र नागरगोजे या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या. त्यांना इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार आहे. विद्यार्थिनींना विभाग प्रमुख रमेश भांड, विषय शिक्षक विजय चव्हाण, प्रेरणा निकाळजे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
यशाबद्दल विद्यार्थी, सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राजश्री मगर, अंजना येवले, नारायण दादा तोडमल, हरिभाऊ शेटे, सुनील पवार, अंबादास पवार, विजय भांड उपस्थित होते. प्राचार्य सुरेश भिंगारदिवे, उपमुख्याध्यापक प्रकाश वाघमारे, पर्यवेक्षक बी. एल. साळुंके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.