नेवासा : एम फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या जाणाऱ्या जीपॅट २०२१ या परीक्षेत मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई (ता.नेवासा) येथील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. सोहेल सय्यद, अस्मिता बोडखे, ज्ञानेश्वर निकम, सुरेश रणखांब, आकांक्षा दहिफळे, ओंकार दरंदले हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. विनायक देशमुख म्हणाले, सोनई फार्मसी महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त संख्येने शिक्षण घेत आहेत. त्यांना औषध निर्माणशास्त्र विषयाच्या परिपूर्ण ज्ञानाबरोबरच इतर विविध स्पर्धा परीक्षा, इतर उपक्रम याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी खासदार यशवंतराव गडाख, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, उपप्राचार्य डॉ. विलास घावटे आदींनी कौतुक केले.
---
२४ सोनई मुळा