शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

उसाला पर्याय.. केशर आंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:53 AM

काळ्या रानात उसाचे पीक घेताना मुरमाड जमिनीवर काय पीक घ्यावे? याचा विचार कुक्कडवेढे (ता. राहुरी) येथील शेतकरी राजेंद्र गव्हाणे हे करीत होते.

भाऊसाहेब येवले

काळ्या रानात उसाचे पीक घेताना मुरमाड जमिनीवर काय पीक घ्यावे? याचा विचार कुक्कडवेढे (ता. राहुरी) येथील शेतकरी राजेंद्र गव्हाणे हे करीत होते. मुरमाड जमिनीत आंबा पीक केल्यास फायदेशीर शेती करता येईल, याचा अभ्यास गव्हाणे यांनी केला.  तीन एकर मुरमाड जमिनीवर दहा वर्षांपूर्वी केशर आंब्याची लागवड केली. साडेतीनशे आंब्याची झाडे ऊसपिकाला भारी असल्याचा अनुभव गव्हाणे यांना आला आहे. आंब्याची रोपे १६ बाय १६ फूट या अंतरावर लावली. सुरूवातीला राजेंद्र गव्हाणे यांनी तीन वर्षे आंतरपिके घेतली. आंबा पिकावर कमी खर्च करण्याचे धोरण आखले. त्यानुसार गावरान गायीचे गोमूत्र, शेण, डाळीचे पीठ, वडाखालची माती, गूळ यांचे मिश्रण पाण्यामध्ये एकत्र करून स्लरी तयार केली. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आंब्याच्या झाडांना स्लरी देण्यात आली. रसायनिक खते व औषध फवारणीचा खर्च टाळला.  त्यामुळे सेंद्रिय आंबे ग्राहकांच्या पसंतीला उतरले. तिसऱ्या वर्षांपासून आंब्याचे फळ धरण्यास सुरूवात केली. शेतकरी ते ग्राहक या पद्धतीने आंब्याची विक्री केली जाते. झाडावरून कै-या उतरल्यानंतर त्या नैसर्गिक पद्धतीने पिकविल्या जातात. त्यानंतर तयार झालेल्या आंब्याची प्रतवारी केली जाते. पिक्यापेक्षा विक्या भारी... या न्यायाने राजेंद्र गव्हाणे हे थेट ग्राहकांना आंब्याची हातविक्री करतात. वळण, मानोरी, कुक्कडवेढे, सोनई, राहुरी, ब्राह्मणी आदी ठिकाणी स्टॉल उभारून आंब्याची विक्री केली जाते. त्यामुळे आंब्याच्या झाडापासून अधिक प्रमाणावर उत्पन्न मिळण्यास मदत होते. कुटुंबातील सदस्य वडील भिकाजी गव्हाणे, मुलगा नीलेश, महेश यांची मदत आंबे विक्रीसाठी होते. ग्राहकांना माहीत असल्याने घरी येऊनही ग्राहक आंब्याची खरेदी केली जाते. ६० रुपये किलो या दराने आंब्याची विक्री केली जाते. एका झाडाला २० ते ३० किलो आंबे निघतात. उत्कृ ष्ट प्रतीचे रसायनरहित आंबे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.आंबा पिकाशिवाय राजेंद्र गव्हाणे यांनी टिश्यूकल्चर जी-९ या वाणाची एक एकरावर ६ बाय ५ या अंतरावर लागवड केली आहे. एका एकरात १५०० केळीच्या रोपांची लागवड केली आहे. केळीमध्ये आंतरपीक तूर पीक घेतले आहे. केळी घडाने लगडली आहेत. केळीला ब-यापैकी भाव मिळणार असल्याने उसापेक्षा केळीतून अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. डाळिंबाचे चार एकरात १२ बाय १० या अंतरावर भगवा वाणाची लागवड केली आहे. डाळिंबाला बहर आला असून, यंदा चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. या शिवाय यांनी गोपालन व्यवसाय केला आहे. जनावरांचे खत शेतीचे उत्पादन वाढविण्यास मदत करीत आहेत. फळबाग लागवड क रताना राजेंद्र गव्हाणे यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब केला आहे.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीFarmerशेतकरी