शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
2
देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेस वापरतेय कर्नाटकचा ब्रेन? सांगितली मविआची स्ट्रॅटेजी
3
मोठी बातमी: तपासणीदरम्यान पोलिसांच्या हाती मोठे घबाड; कारमध्ये सापडले २ कोटी रुपये!
4
हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप
5
KKR चा 'भारी' डाव! श्रेयस अय्यरला रिटेन करणार नाही; फ्रँचायझीला होणार मोठा फायदा
6
"मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना आधीच माहिती होतं की नव्हतं?"
7
अजित दादांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याने फडणवीस नाराज, म्हणाले, 100 टक्के...
8
Explainer : एक विधान बारामतीच्या निवडणुकीचा रंग बदलणार? अजितदादा बोलून गेले, पवारांनी अचूक हेरले; आता...
9
एक बातमी आणि 'या' डिफेन्स कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; पोहोचला ₹१००० पार 
10
पूजा खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
11
NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला!
12
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
13
जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, एक्स्प्रेससाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय
14
Maharashtra Election 2024: शिवसेना उमेदवार सुहास कांदेविरोधात गुन्हा दाखल
15
Maruti Suzuki Company Share : तब्बल १७ वर्षांनंतर मारुती सुझुकीची 'ही' कंपनी देणार बोनस शेअर्स, स्टॉकमध्ये मोठी तेजी
16
IPL 2025 : वॉशिंग्टन सुंदरचा 'भाव' लय वाढला; ताफ्यात घेण्यासाठी मुंबईसह तीन संघ उत्सुक
17
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
18
पंखा पाहिल्यावर भीती वाटते का?; अर्जुन कपूरही 'या' आजाराने त्रस्त, 'ही' आहेत लक्षणं
19
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
20
क्विक कॉमर्स कंपनी Blinkit वरून सोन्याचं नाणं खरेदी करणं पडलं महागात, झाला स्कॅम; प्रकरण काय?

पावसाळ्यातील निवा-यासाठी ‘सुगरणी’ची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:16 PM

कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी परिसरातील एका विहिरीच्या काठावरील पिंपळाच्या झाडाला मनमोहक विणकाम केलेले घरटे तयार करताना सुगरण पक्षी परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

काकासाहेब खर्डे/  धामोरी : धरतीने हिरवा शालू परिधान करताच सुगरण पक्षांनाही विणीच्या हंगामाचे वेध लागले आहेत. कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी परिसरातील एका विहिरीच्या काठावरील पिंपळाच्या झाडाला मनमोहक विणकाम केलेले घरटे तयार करताना सुगरण पक्षी परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.पावसाळ्यातील दिवस हे सुगरण पक्षांचा घरटे विणीचा हंगाम असतो. साधारण आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये हा पक्षी अंडी घालतो. त्यामुळे ती अंडी घालण्यासाठी सुगरण पक्षी वैशिष्ट्यपूर्ण असे एक घर बांधतो. एकेक काडी गोळा करून त्याची सुबक अशी रचना करताना तिच्याही नाकी नऊ येतेच. सुगरण पक्षांना ग्रामीण भागात रानचिमणी किंवा पिवळी चिमणी म्हणतात. नर सुगरणीचा रंग पिवळा असतो. तर मादी करड्या रंगाची असते. सुगरणी घरटे झाडावर उलट्या दिशेने तयार करतात. तर नर सुगरण मादीला आकर्षित करण्यासाठी एकाच झाडावर दोन - तीन घरटे तयार करतो. जे घरटे मादीला पसंद पडते ते ती स्वीकारते व त्यात त्यांचा संसार सुरू होतो. बाकीचे घरटे मग तशीच अर्धवट राहतात.

बोर, काटेरी बाभूळ आदी प्रकारच्या काटेरी झाडांना अडचण समजून त्यांना तोडू नयेत. घरटे बांधण्यासाठी जास्तीत जास्त अशाच काटेरी झाडांची पक्षी निवड करतात. त्यामुळे वृृक्षारोपण करताना देखील या प्रकारची झाडेही योग्य जागेची निवड करून लावण्याची गरज आहे, असे पक्षीमित्र सतीश साबळे यांनी सांगितले. 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यAhmednagarअहमदनगर