श्रीगोंदा : प्रियकराकडून फसवणूक झाल्याने आलेल्या नैराशातून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील शासकीय वसाहतीत २४ जुलै रोजी दुपारी घडली. मात्र या पिडीत तरुणीचा शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याप्रकरणी तरुणीचा प्रियकर धनंजय विष्णुपंत कांबळे (रा. करमाळा, जि. सोलापूर), विजय विष्णूपंत कांबळे व विजयाची पत्नी यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही तरुणी आपल्या आत्याकडे श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वसाहतीत राहत होती. तिचा प्रियकर हा धनंजय हा जामखेड तालुक्यातील जवळे येथील अहमदनगर जिल्हा बँकेच्या शाखेत कॅशियर आहे. त्यांचे मोबाईलवर सुत जुळले. मी अविवाहित असून आपण लग्न करू. प्रेमाच्या गुलाबी जाळ्यात ओढले. शारिरीक संबध ठेवण्यासाठी तो दर सुट्टीत आपला बंधू विजय कांबळे यांच्याकडे श्रीगोंद्याला येत होता. विजय कांबळे हा मुलगी राहत असलेला वसाहतीत रहात आहे. यानंतर या तरुणीला धनंजय हा विवाहित समजले. प्रियकराने लग्नास दिला. नंतर त्याने तिला वारंवार जिवे मारण्याची धमकी दिली. या कारणातून तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केली, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणातील तीनही आरोपी फरार झाले आहेत.