शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

प्रसंगी कुटुंबाचा विरोध पत्करून खासदारकी लढविणार : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 10:52 AM

गत चार वर्षे लोकसभेची तयारी करीत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नगर लोकसभा लढविणार. काँग्रेसला हा मतदारसंघ सुटेल, अशी अपेक्षा आहे.

अहमदनगर : गत चार वर्षे लोकसभेची तयारी करीत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नगर लोकसभा लढविणार. काँग्रेसला हा मतदारसंघ सुटेल, अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास कुठल्याही पक्षातून निवडणूक लढविण्याची तयारी आहे. अगदी राष्ट्रवादी, शिवसेना,बसपा व भाजपसुद्धा. या प्रक्रियेत वडिलांची व आपली विचारधारा वेगळी झाली तरी नाईलाज आहे. कुटुंबाचा विरोध पत्करू पण खासदारकी लढवू. खासदारकीच्या माध्यमातून नगर शहराचे चित्र बदलवू. केवळ महापालिका विकास करु शकत नाही, असे डॉ. सुजय विखे यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत सांगितले.प्रश्न : दानवे यांनी शहराला तीनशे कोटी देऊ केले आहेत.विखे : गेल्या १५ वर्षात जे निधी देऊ शकले नाहीत, ते आता फलक लावून काय दिवे लावणार? सत्ता आली तरच निधी देऊ असे सांगणारे दानवे यांनी यापूर्वी त्यांच्या खासदाराला निधी का नाही दिला? सत्ता आली तरच विकास करणार का? मागच्या विधानसभा, महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांनी दिलेले जाहिरनामे वाचा आणि झालेली कामे पहा. एकही काम झाले नसेल. मग हे भाजप वचननामे,संकल्पनामे कशासाठी देत आहे? पंतप्रधान झाल्यानंतर प्रत्येकाला १५ लाख देऊ म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी पैसे दिले का? मग शहराला तीनशे कोटी देण्याबाबत काय भरवसा? राजकीय पक्षांचे जाहीरनामे लोकांच्या बेडखाली सापडतात किंवा रद्दीत जातात. त्यांना काहीही किंमत उरलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष काम करणे महत्त्वाचे आहे. भाजपने तसे काम शहरात दाखवावे मग मते मागावीत.केडगाव हत्याकांड व अधीक्षक कार्यालावरील हल्ल्याबाबत तुमचे मत काय?विखे: या दोन्ही घटना वाईट आहेत. शिवसैनिकांची झालेली हत्या दुर्देवी आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेला हल्लाही वाईटच आहे. दहशत पसरविणाºयांवर जरुर कारवाई व्हावी. मात्र, या गुन्ह्यांत अनेकांना राजकीय आकसाने अडकविलेले दिसते. राजकारणामुळे लोकांवर गुन्हे दाखल होणे व त्यांना हद्दपार करणे चुकीचे आहे.नगरचा विकास का रखडला आहे?विखे: महापालिकेत आयुक्त टिकत नाहीत. कामगारांचे पगार नाहीत. पालिकेत टक्केवारी घेतल्याशिवाय कामे होत नाहीत. लोकांची मानसिकता बदलली तरच हे चित्र बदलेल. लोकांनी जात-धर्म न पाहता मतदान केले तरच हे शहर सुधारेल. नगरकरांनी दहशत झुगारणे व चांगले लोक निवडून देणे हाच विकासावरील पर्याय आहे. लोकही याला जबाबदार आहे.प्रश्न : तुमचा जाहीरनामा काय?विखे : मागील निवडणुकीचे वचननामे लोकांनी तपासावे. ते पन्नास टक्के पूर्ण नसतील तर लोकांनी अशा पक्षांना व उमेदवारांना नाकारावे. त्यामुळे घोषणांना काहीच अर्थ उरलेला नाही. नुसते जाहीरनामे काय उपयोगाचे?प्रश्न : जिल्ह्यातील किल्लेदार नगर शहराकडे पाहत नाहीत.विखे : असे काही नाही. विखे परिवाराने दक्षिणेत मोठे काम केले. स्थानिक लोकप्रतिनिधींना महत्त्व असते. नगरचे खासदार, आमदार यांनी नगरचा कायापालट करणे अभिप्रेत होते. आपण महापालिका व खासदारकीच्या माध्यमातून नगर शहरात लक्ष घालू शकतो. नगर शहराच्या विकासाला नैसर्गिक मर्यादाही आहेत. जुन्या शहरात गल्ल्या लहान आहेत. त्यामुळे उपनगरांचा विकास करणे आवश्यक आहे. पण, कॉंग्रेसकडे मर्यादीत संख्याबळ आहे. राष्टÑवादीच्या अजेंड्याला साथ देऊ.प्रश्न : तुम्ही किती सामान्य लोकांना उमेदवारी दिली?विखे : काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांनी चांगले काम केले. विद्यमान नगरसेवकांना तर उमेदवारी द्यावीच लागते. जे काही नवे उमेदवार आहेत, ते अगदी सामान्य घरातील आहेत. त्यांची घरेही अगदी साधी आहेत. राजकारण हे अर्थकारणाशी जोडून चालणार नाही. क्षमता जेवढी असेल तेवढी मदत करण्याची तयारी आहे. लोकांपर्यंत गेले तर पैशांपेक्षा आपुलकीला महत्त्व देतात. सातत्याने काम करणाºयांना लोक पुन्हा निवडून देतात. राहाता येथे एका कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने मी त्याला संस्थेत काम दिले, मात्र लोकांनी त्याला राहाता नगरपालिकेत निवडून दिले. ते त्याच्या संपर्क आणि केवळ कामामुळेच. आज काल फिरायला कोणीच तयार नसल्याने जो तो पैशांचा वापर करतो. मात्र काम करणाºयांना कोणीच पाडू शकत नाही. काँग्रेसमधील गटबाजी युवक आघाडीच्या स्तरावर मिटली आहे. सत्यजित तांबे युवकचे प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला. ज्येष्ठ ज्येष्ठांचे सांगतील. आमच्या पातळीवर मात्र वाद संपलेले आहेत.जिल्हा विभाजनाला माझा विरोध नाही. प्रत्येक तालुक्याला जिल्हा घोषित करा. मात्र जिल्हा विभाजनानंतर मोठा खर्च होणार आहे, त्याला माझा विरोध आहे. नव्या जिल्ह्यावर खर्च करण्याऐवजी तोच खर्च आता तालुक्यांच्या विकासासाठी केला पाहिजे.मराठा आरक्षण जाहीर होते, पेढे वाटले जातात, फटाके फोडले जातात. नंतर निवडणुका येतात आणि आरक्षण कोर्टात स्थगित होते. तेलंगणात लिंगायत समाजाला आरक्षण दिले, तिथेही काँग्रेसचे सरकार पुन्हा आले नाही. गतवेळी महाराष्ट्रातही काँग्रेस सरकारने १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पुढे राज्यातही काँग्रेसचे सरकार आले नाही. जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत एका कवडीचाही फायदा सरकारला होणार नाही. नगर शहरात जगताप- विखे यांची आघाडी नक्की राहील. मात्र लोकसभेला जगताप यांच्याविरुद्ध लढायची वेळ आली तरी त्याला काही पर्याय असणार नाही. माझ्या आजोबांपासून आ. कर्डिले यांचे संबंध आहेत. त्यांनी मला राहुरी कारखान्यात मदत केली. जिल्हा बँकेतून कर्ज मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पक्ष कोणताही असो जो माणूस पाच वेळा निवडून येतो, त्याअर्थी त्यांच्यात काहीतरी असले पाहिजे आणि ते शिकण्यासारखे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका