- भाऊसाहेब येवलेराहुरी (जि. अहमदनगर) - तब्बल सात महिन्यांच्या विलंबानंतर २१ व २२ एप्रिलला बीड येथे सहावे व्यसनमुक्ती साहित्य संमेलन होणार आहे़ या विलंबामुळे कडक उन्हाच्या झळा उपस्थितांना सहन कराव्या लागणार आहेत़शिवाजीराव मोघे सामाजिक न्यायमंत्री असताना व्यसनमुक्ती चळवळीतील कार्यकर्त्यांनी साहित्य संमेलन भरविण्याची मागणी केली होती. त्यानुसार पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २ आॅक्टोबर २०११ रोजी पुणे येथे झाले. पुढील दोन वर्षे नियमित २ आॅक्टोबरला साहित्य संमेलन नागपूर, मुंबई येथे झाले. मात्र काँगे्रस आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर गांधी जयंतीदिनी साहित्य संमेलन भरविण्याची परंपरा खंडित झाली. गेल्या वर्षी व्यसनमुक्ती साहित्य संमेलन पाच महिने उशिरा झाले.संमेलनासाठी १८ लाख रुपयांची तरतूद केली जाते़ गेल्या वर्षी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर संमेलन अमरावतीला घेण्यात आले़ यंदा २१ मार्चला बीड येथे संमेलन घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र विधानसभा अधिवेशनामुळे संमेलन पुढे ढकलण्यात आले होते़
व्यसनमुक्ती साहित्य संमेलनास उन्हाळ्याच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 5:07 AM