शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

संडे अँकर : ४४ शिक्षकांची वेतनवाढ थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 4:21 PM

मागील वर्षी सोयीच्या बदलीसाठी बोगस कागदपत्रे, चुकीची माहिती सादर करुन बोगस पद्धतीने बदली मिळविणाऱ्या ४४ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे़

अहमदनगर : मागील वर्षी सोयीच्या बदलीसाठी बोगस कागदपत्रे, चुकीची माहिती सादर करुन बोगस पद्धतीने बदली मिळविणाऱ्या ४४ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे़ गेल्या एक वर्षापासून ही कारवाई रखडली होती़ अखेर ३० मेच्या रात्री शिक्षकांवरील कारवाईच्या फाईलवर मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी सही केली़बोगस कागदपत्रे सादर करुन किंवा दिशाभूल माहिती देऊन मागील वर्षी बदली मिळविणाºया शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले होते़ मात्र, वर्ष उलटले तरीही या शिक्षकांवर जिल्हा परिषदेकडून काहीही कारवाई झालेली नव्हती़ ९८ शिक्षकांनी दिशाभूल करणारी व बोगस कागदपत्रे सादर करुन बदली मिळविल्याचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागाला सादर झाला होता़ त्यानंतर शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांना नोटिसा बजावून त्यांचा खुलासा मागितला होता़ हा खुलासा आल्यानंतरही सुमारे सहा महिने या शिक्षकांवरील कारवाई रेंगाळली होती़ अखेरीस बदली प्रक्रिया सुरु झाल्यानंतर या शिक्षकांवरील कारवाईची फाईल मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली़ मुख्याधिकाºयांनी ३० मे रोजी रात्री फाईलवर सही करुन दोषी आढळलेल्या ४४ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली़ कारवाई झालेल्या शिक्षकांना या वर्षी संगणकीय मॅपिंग करु देऊ नये, असे आदेश सरकारने दिले आहेत़ शनिवारी (दि़१) शिक्षकांच्या बदलीसाठी अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली़ त्यात गेल्या वर्षी बोगस पद्धतीने बदली मिळविणाºया शिक्षकांचाही या बदलीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे़इतर शिक्षकांवर अन्यायमागील वर्षी बोगस कागदपत्रे, चुकीची माहिती सादर करुन बदली मिळविणाºया शिक्षकांमुळे इतर बदलीपात्र शिक्षकांवर अन्याय झाला होता़ त्यामुळे यंदाच्या बदलीप्रक्रियेत मागील वर्षी बोगस बदली मिळविणाºया शिक्षकांचा समावेश करु नये, अशी शिक्षकांची मागणी होती़ त्याऐवजी मागील वर्षी अन्याय झालेल्या शिक्षकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी अनेक शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे लावून धरली होती़ त्यासाठी या वर्षीच्या बदलीच्या नियमावलीचाही दाखला देण्यात आला होता़ मात्र, बदलीच्या यादीत गेल्या वर्षी बोगस बदली मिळविणाºया व कारवाई झालेल्या शिक्षकांचीही नावेही आहेत़ त्यामुळे त्यांचीही बदली होणार आहे़मागील वर्षी बोगस कागदपत्रे सादर करुन बदली मिळविणाºया ४४ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचा आदेश ३० मेच्या रात्री काढण्यात आला आहे़ तसेच या शिक्षकांची पुन्हा बदली करण्यात येणार आहे़ मात्र, संगणकीय प्रणालीतील बदलीपात्र शिक्षकांची बदली झाल्यानंतर या ४४ शिक्षकांची बदली करण्यात येणार आहे़ त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही़ उलट त्या ४४ शिक्षकांवर कारवाई म्हणून ही बदली केली जात आहे़- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद