भाऊसाहेब येवले राहुरी : तालुक्यातील पूर्व भागाला मुळा नदी जीवनदायीनी ठरली आहे़ मांजरी येथे ग्रामस्थांनी एकजुटीतून वाळू उपसा रोखला आहे. स्थानिक ग्रामस्थांना बांधकामासाठी वाळूची गरज निर्माण झाल्यानंतर बैलगाडीतून वाळू वाहून नेली जाते़ त्यामुळे हे गाव पाणीदार बनले आहे.मुळा नदीच्या पूर्व भागात अथांग वाळू साठा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्क ा बसतो़ मांजरीसह परिसरातील गावकरीही अभिमानाने वाळू उपसू दिली जात नसल्याचे छातीवर हात ठेऊन सांगतात़ येथील शेतकऱ्यांनी थेट औरंगाबाद खंडपीठात जाऊन वाळूला विरोध केला़ दरवर्षी शासकीय परिपत्रक ग्रामपंचायतीकडे येते़ गावकरी एकमताने वाळू उचलायची नाही, असे म्हणणे मांडतात़ सर्वानुमते ठराव पारीत होतो़ त्यामुळे पूर्व भागात वाळूचा लिलाव होत नाही. त्यामुळे एक पिढीपासून वाळू नदीपात्रात मोत्यासारखी दिसत आहे़ वाळू जपली तर आपण जिवंत राहू याची खात्री गावक -यांना पटली आहे़त्यामुळे गावातील वाळू गावातच राहिली पाहिजे अशी ग्रामस्थांची धारणा झाली आहे़ गावाच्या परिसरात बांधकामासाठी वाळू लागल्यास नियम ठरवून देण्यात आला आहे़ चारचाकी वाहनातून वाळू वाहतूक नाही़ केवळ बैलगाडीने वाळू वाहण्याची परवानगी आहे़ त्यामुळे मर्यादीत स्वरूपात वाळूचा उपसा सुरू आहे. मुळा नदी पात्रातील वाळू न उचलल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे़ परिसरात वाळू उचलण्याचे गुंडांनी केलेले प्रयत्न हाणून पडले आहे़ लष्करालादेखील येथील ग्रामस्थांनी वाळू उचलू दिली नव्हती, त्यामुळे वाळू उचलेगिरी करणा-यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे़ गावक-यांचा वाळू उपसा करण्यास इतका विरोध आहे की कुणी चारचाकी घेऊन नदीपात्रात आले की सर्व गावकरी जमा होतात़गावक-यांची एकी पाहून कुणीही वाळू उचलीत नाही़ आपले वाहन जाळण्याची भीती असल्याने अलिकडील काळात कुणीही वाळू उचलण्याचा साहस करीत नसल्याचे चित्र आहे़वाळू उचलण्याच्या लिलावाला गावकरी ग्रामसभेत विरोध करतात़ वाळू संदर्भात ग्रामस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे़ गाव वाचवयाचे असेल तर वाळ उचलू द्यायची नाही हे ग्रामस्थांचे धोरण आहे़ दररोज दहा ते बारा बैलगाड्या वाळू उचलली जाते़ त्याचा काहीही परिणाम होत नाही़ -विठ्ठल विटनोर, सरपंच, मांजरीवाळू सुरक्षित असल्यानेच विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी टिकून आहे़ पिकांना दिलासा मिळाला आहे़ जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़ वाळू घरगुती कामापुरती वापरली जाते़ त्यामुळे गावाचा फायदा होत आहे. - कृशाराम जाधव, शेतकरी