नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर तालुका कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, संगमनेर पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, ॲड. त्रिंबक गडाख, शिवाजी गोसावी, शिवाजी जगताप, दत्तात्रय खुळे, बाबासाहेब वामन, बाळासाहेब पवार, तात्याराम कुटे, नवनाथ आंधळे, मोहन करंजकर, साहेबराव गडाख, अण्णासाहेब राहिंज, विलास नवले, आनंद वर्पे, अनिल गोर्डे, बंटी यादव, भारत सातपुते, सुभाष गुंजाळ, संतोष हासे, विनोद गायकवाड, संजय कोल्हे, सुनील सांगळे, मच्छिंद्र सातपुते आदी या वेळी उपस्थित होते.
देशात यापूर्वी कधीही नव्हती एवढी महागाई वाढली आहे. या महागाईत सर्वसामान्य जनता होरपळते आहे. महागाई कमी व्हावी, इंधनाचे वाढलेले दर कमी करावेत. केंद्रीय कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचे केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे. परंतु हे कायदे शेतकरीविरोधी असून ते मागे घ्यावेत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.