नेवासा : ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ या वृक्ष लागवड मोहिमेला जनजागृतीद्वारे पाठबळ देऊ. तसेच कोरोनामुळे प्रलंबित असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर तीर्थक्षेत्र विकास कामांनाही गती देणार असल्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेनुसार ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ मोहिमेचा प्रारंभ नेवासा येथे गुरुवारी (दि.२४) वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या बाहेरील प्रांगणात नगरपंचायतच्या वतीने झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, विश्वस्त विश्वास गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, नगराध्यक्षा योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, गणेश पवार, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, गटविकास अधिकारी शेखर शेलार, उपवनरक्षक सुवर्णा माने, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी कीर्ती जमधडे, नगरसेविका अंबिका ईरले उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, ऑक्सिजनची भासलेली टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषदेच्या मार्फत एक व्यक्ती एक झाड उपक्रम घ्यावा, अशी संकल्पना मनात आली. शासनाचा कोणताही आदेश नसून हा उपक्रम गरज ओळखून हाती घेण्यात आला आहे.
मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रामभाऊ जगताप,देवस्थानचे अध्यक्ष ॲड. माधवराव दरंदले, विश्वस्त कैलास जाधव, भिकाजी जंगले, नंदकिशोर महाराज खरात, राजेंद्र उंदरे, नगरसेवक रणजित सोनवणे, सतीश पिंपळे, जितेंद्र कुऱ्हे, सचिन वडागळे, संदीप बेहळे, फारूक आतार, दिनेश व्यवहारे, अंबादास इरले, अल्ताफ पठाण, जालिंदर गवळी, भैया कावरे उपस्थित होते.
-----
तीर्थक्षेत्र विकास कामांना गती देऊ
गडाख म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास योजनेचे काम सात ते आठ वर्षांपासून रेंगाळले याबाबत खंत व्यक्त केली. त्यांनी तीर्थक्षेत्र विकास कामांना गती देऊन त्यास भरीव निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली. यासाठी केंद्र शासनाकडे राहिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले.
---
२४ नेवासा गडाख
नेवासा येथे वृक्ष लागवड करताना मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले.