राहुरी : अट्टल दरोडेखोरांनी सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येथील गोकुळ क ॉलनी परिसरात पोलिसांवर पाच मिनिटे दगडफे क केली. भिंतीचा आधार घेत पोलीस निरीक्षक मुकुंद गायकवाड यांच्या पथकाने तीन जणांना पकडले. अन्य दोघे पळून जाण्यास यशस्वी ठरले. पोलिसांनी गोळीबार करण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच दरोडेखोर हाती लागल्याने पुढील धोका टळला.राहुरी येथील गोकुळ कॉलनीमध्ये दरोडा घालण्यासाठी सहा जण काटेरी झुडुपांच्या मागे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी पोलीस आल्याचे पाहताच दरोडेखोरांनी पथकावर दगडाचा मारा सुरू केला. दगडाचा मारा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी भिंतीचा आधार घेतला़. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार करण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच एकास पकडले. त्यानंतर पाठलाग करुन अन्य तिघांनाही जेरबंद केले. पकडलेल्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी गॅसकटर, गॅस टाकी, कटावणी, कात्री व दोन मोटारसायकलसहअन्य साहित्य जप्त केले आहे. दरोडेखोर हे सराईत गुन्हेगार आहेत. ते संगमनेर, श्रीरामपूर आदी भागातील असल्याचे समोर आले आहे. सागर गोरख मांजरे (रा.पाईपलाईन रोड, अहमनगर),अविनाश अजित नागपुरे (रा. भिंगार, ता़नगर), गणेश मारूती गायकवाड (रा. उक्कलगाव, ता़श्रीरामपूर) असे पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राक्षे, पाखरे, मेढे, शिंदे, अमित राठोड, दिवे, बोडखे व दोन होमगार्ड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल हे करीत आहेत.फरार आरोपींच्या शोधासाठी पथकेराहुरी पोलिसांनी पकडलेल्या तीन दरोडेखोरांची चौकशी सुरू केली आहे. फरार झालेल्या दोन जणांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. हे सर्व दरोडेखोर सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यापासून राहुरी तालुका व परिसरात भुरट्या चो-या, रस्ता लूट, दरोड्यांच्या घटनात वाढ झाली आहे. या टोळीकडून त्यांनी आणखी विविध ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची चिन्हे आहेत.
राहुरीत पोलीस अन् दरोडखोरांमध्ये थरार..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 11:58 AM