प्रशासकीय कार्यालयात कोरोनावरील उपाय योजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप, निरीक्षक मसूद खान, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे आदी उपस्थित होते.
कानडे म्हणाले, मुंबई येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये कोरोनाच्या फैलावामागील काही प्रमुख कारणे समोर आली. त्यात कोरोनाची चाचणी करून घेण्यास संशयीत पुढे येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर रुग्णाच्या संपर्कातील २० ते २५ लोकांपर्यंत जाऊन त्यांची चाचणी करण्यात चालढकल केली जात आहे. त्याला अधिक गती देण्याची गरज आहे.
शहरातील दुकानदारांनी ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर पाळण्याकरिता उपाययोजना राबवाव्यात. प्रत्येकाला मास्क वापरण्याची सक्ती करावी. बाजार समितीमध्ये होणार्या गर्दीला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाने सचिवांना सहकार्य करावे. नगरपालिकेने कोरोनाचे नियम न पाळणार्या लोकांवर दंडात्मक कारवाई करावी. पोलिसांचीदेखील मदत घ्यावी, असे आमदार कानडे म्हणाले.
यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार यापुढे कदापि खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला. याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी खासगी डॉक्टरांचे तातडीने लसीकरण केले जावे अशी मागणी केली. डॉ.रवींद्र कुटे यांनी मनोगत व्यक्त केले.
----------