११ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे व त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता मिस्किनमळा येथील झाडीत अत्याचाराची घटना घडली. याबाबत सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विकास वाघ हा मला ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे घेऊन गेला. तेथे त्याने लाकडी दांड्याने मारहाण करत तू माझ्याविरोधात दाखल केेेलेला गुन्हा मागे घे, असे म्हणत तो मला गंगा उद्यान परिसरातील मिस्किनमळा परिसरात घेऊन गेला. तेथे मी तुला पीएसआयच्या परीक्षेत मदत करतो तसेच तुझे माझ्याकडे असलेले मंगळसूत्र परत करतो, असे म्हणून वाघ याने अत्याचार केला. यावेळी वाघ याने मंगळसूत्र व रोख ६० हजार रुपये हिसकावून नेल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक इडेकर हे पुढील तपास करत आहेत.
--------------------------------------------------------------------------
आधीचा गुन्हा कोतवाली ठाण्यात
विकास वाघ याच्याविरोधात सप्टेंबर २०२० मध्ये याच महिलेने कोतवाली स्थानकामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. वाघ याने मारहाण करत रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अत्याचार केल्याचे या फिर्यादीत म्हटले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाघ याच्यावर निलंबनाची कारवाई झाली. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.