अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेला. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक आणि एक स्टाफ नर्सेसना निलंबित करण्यात आले आहे, तर यामध्ये दोन नर्सेसची सेवा समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता नर्सेसमध्ये संताप उमटला असून आम्हाला सर्वांनाच निलंबित करा. आमची काय चूक ? अग्निशामक यंत्रणा बसवणे हे काय आमचे काम आहे का ?असा सवाल त्यांनी केला आहे.
जिल्हा रुग्णालयातील सर्व नर्सेस काम सोडून बाहेर आल्या असून आम्हाला आता निलंबित केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्हाला निलंबित करा किंवा त्यांचे तरी निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. आमची मागणी सरकारकडे पोहोचवा असे त्यांनी सांगितले.कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमची जीव धोक्यात घालून काम केले.जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आग अग्निशमन यंत्रणा नसल्याने लागली आहे. अग्निशमन यंत्रणा बसवणे काय आमचं काम नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.