सत्यजित कदम म्हणाले, देवळाली प्रवरा येथे दोन दिवसापूर्वी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात श्रीरामपूरच्या परमभक्त हनुमान मंदिरात आमदार कानडे यांनी बोलताना बेताल वक्तव्य केले. त्यांनी देवळाली प्रवरा येथे साईचरित्र पारायण सोहळ्यातील भक्तांना जेवणाची पंगत कबूल करून त्यांचे २३ हजार रुपये बुडवले. ती रक्कम लोकवर्गणीतून जमा करून भाजीपाला व किराणा व्यापाऱ्याला द्यावी लागते. अशा फसव्या वृत्तीच्या आमदार कानडे यांना राममंदिरावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. देवळाली प्रवराच्या संस्कृतीमुळे रामभक्त शांत राहिले अन्यथा त्यांच्या व्यासपीठावर येऊन दोन हात करण्याची रामभक्तांची तयारी झाली असती. यावेळी नगरसेवक अण्णासाहेब चोथे, संजय बर्डे, जगन्नाथ चव्हाण, गोरख मुसमाडे, आनंद कदम, शहाजी कदम, सोपान शेटे, भारत शेटे, सोपान भांड, दिलीप मुसमाडे, राजेंद्र डोळस, सुधीर टिक्कल, संदीप कदम, दिगंबर पंडित, सुखदेव भोले, संदीप मुसमाडे उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे व नीलेश वाघ यांनी निवेदन स्वीकारले.