श्रीगोंदा : कोरोना लॉकडाऊनसंदर्भात नियम तोडणा-यांवर कारवाई करा. त्याचा अहवाल रोज पाठवा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी बुधवारी (दि.१७ जून) श्रीगोंदा येथे दिल्या.
जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी बुधवारी सकाळी अचानक भेट दिली. तालुक्यात भविष्यात कोरोनाचा संसर्ग वाढला तर तालुक्यात रुग्णावर उपचार करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा व हॉस्पीटल सज्ज आहेत का? यांची पाहणी केली. तहसील कार्यालयात, महसूल, आरोग्य, पोलिस विभागाची बैठक घेतली. काही महत्वपूर्ण सूचना दिल्या.
प्रशासकीय टीमने केलेले काम जनतेने केलेले सहकार्य यावरही त्यांनी समाधान व्यक्त केले.
यानंतर द्विवेदी यांनी मोरेदादा हॉस्पीटल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, स्वामी विवेकानंद मेडीकल कॉलेजची पाहणी केली. यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर उपस्थित होते.