अकोले तालुक्यातील कृषी पंप ग्राहकांची वीज बिल थकबाकी १४८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. राज्य शासनाने वसुलीसाठी कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी सुलभ वसुली योजना आणली आहे. या योजनेद्वारे मोठ्या प्रमाणात व्याज व दंड माफ करण्यात येत आहे.
वीज वितरण विभागाच्या अकोले विभागात १२ हजार ४६० कृषी पंपधारक शेतकरी आहेत. या विभागाची एकूण थकबाकी १२४ कोटी २० लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे राजूर उपविभागात ५६०० कृषी पंप ग्राहक असून त्यांचेकडे एकूण ५९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तालुक्याची एकूण थकबाकी १४८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही थकबाकी वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आहे. कृषी पंप धारकांनी चालू वीज बिल भरणे मात्र सक्तीचे आहे अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मावडे यांनी केले आहे.