शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

तमाशा कलावंत हल्ला प्रकरण : तब्बल ११ तासानंतर तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 6:39 PM

टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या हरीभाऊ बडे सह शिवकन्या कचरे यांच्या तमाशातील कलावंतांवर गावातील गुंडांनी प्राणघातक हल्ला करत महिला कलाकारांचा विनयभंग केला.

ठळक मुद्देतब्बल ११ तासानंतर हल्लेखोरांवर गुन्हा दाखलएका आरोपीस अटकशाळकरी मुलीवर अत्याचारराज्यभर घटनेचा निषेधतर यात्रा कमिटी आरोपी

श्रीगोंदा : टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या हरीभाऊ बडे सह शिवकन्या कचरे यांच्या तमाशातील कलावंतांवर गावातील गुंडांनी प्राणघातक हल्ला करत महिला कलाकारांचा विनयभंग केला. या हल्ल्यामध्ये बारा तमाशा कलावंत जखमी झाले आहेत. याप्रकरणी गावातील तेरा जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.तमाशा कलावंत शिवकन्या नंदा कचरे (रा.कोरडगाव ता.पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप सुरेश सुडगे, अशोक माऊली सुडगे, शांताराम सुडगे, गणेश कैलास जगदाळे, सचिन सुरेश सुडगे, नितीन मल्हारी जगदाळे यांच्यासह पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीत बाजार समितीचे माजी उपसभापती सुरेश सुडगे यांच्या दोन मुलांचा समावेश आहे.भा.द.वि. कलम ३२६,३५४,१४३,१४७ व बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २0१२ चे कलम ७,८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मारहाणीत शिवकन्या कचरे, राणी बडे, सचिन चव्हाण, अशोक बडे, मुबारक जमादार, देवानंद कांबळे, प्रशिक्षक कांबळे, अनिल बांगर, पप्पू गोरे, मयूर गोरे, मयुर चव्हाण, अस्लम बेगमिर्झा हे जखमी झाले आहेत. जखमींना नगर येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेनंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता अखील भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष अविष्कार मुळे व पठ्ठे बापुराव तमाशा परिषदचे अध्यक्ष संभाजी जाधव, एल. जी. शेख हे श्रीगोंद्यात दाखल झाले. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दुपारी सव्वा दोन तपासासाठी दोन पथके तैनात करण्यात आली. आरोपींच्या अटकेसाठी बीड व टाकळीकडे पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी एका आरोपीस एटक केलीआहे.शाळकरी मुलीवर अत्याचारपुढील शिक्षणासाठी दोन पैसे मिळावेत यासाठी एक मुलगी तमाशात काम करत होती. मात्र गावातील या हल्लेखोरांनी या मुलीला ऊसात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिला उसामध्ये नेऊन कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तिचा हात मोडला. तमाशा कलावंतांनी त्या मुलीची सुटका केली.तर यात्रा कमिटी आरोपीआरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक केली आहे.यात्रा कमिटी सदस्यांनी आरोपी पकडून देण्यासाठी मदत केली नाही तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे.- संजय सातव, पोलिस उपअधीक्षक, कर्जतराज्यभर निषेधतमाशा कलावंत लोककला जीवंत ठेवण्यासाठी गावोगाव फिरत असतात. टाकळी गावातील गुंडांनी आमच्या कलाकारांना मारहाण करून निंदनीय कृत्य केले. याचा आम्ही महाराष्ट्रभर निषेध नोंदविणार आहे. आरोपीच्या अटकेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. -अविष्कार मुळे, अध्यक्ष, अखील भारतीय तमाशा परिषद.

 

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा