राहुरी : राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगामाची तयारी सुरू असताना संचालक मंडळाच्या बैठकीत आज सकाळी चेअरमन उदयसिंह पाटील व व्हाईस चेअरमन शामराव निमसे यांनी राजीनामे सादर केले आहेत.ज्येष्ठ संचालक नामदेव ढोकणे व के. एम. पाटील यांची नावे आता चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी चर्चेत आहेत. या संदर्भात कारखान्याचे व्हाईस चेअरमन शामराव निमसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही वैयक्तिक कारणामुळे राजीनामे दिले आहेत. चेअरमन उदयसिंह पाटील यांचा फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नामदेव ढोकणे हे व्याही आहेत. सुरुवातीपासूनच चेअरमन होण्यासाठी ते उत्सुक होते. कारखान्याच्या निवडणुकीला अजून दीड वर्षाचा कालावधी आहे. बैठकीला खासदार सुजय विखे उपस्थित नव्हते.
तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांचा राजीनामा, आता ढोकणे यांचे नाव चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 2:33 PM