अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी २१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आज सर्वाधिक नगर तालुक्यात सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
गुरुवारी आढळून आलेल्या २१ रुग्णांमध्ये नगर तालुक्यात सहा, नगर शहरात तीन, श्रीरामपूर तालुक्यात दोन, नेवासा तालुक्यात दोन, अकोले तालुक्यात एक, संगमनेर तालुक्यात एक, जामखेड तालुक्यात दोन, भिंगारमध्ये एक आणि कर्जत तालुक्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवेस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, आता एकूण रुग्णांची संख्या ७४९ इतकी झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांना स्वॅब घेण्याची मुभा दिली आहे. नगर शहरात रामकरण सारडा वसतिगृहात कोरोनाची चाचणी सुरू करण्यात आली आहे.