राहुरी : राहुरी तालुक्यातील कामधेनू असलेल्या डॉ. सुजय विखे सहकारी साखर कारखान्याचे सूत्रधार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले. याशिवाय कामगारांची थकीत देण्याचे संदर्भात तरतूद करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
आज तनपुरे साखर कारखान्यावर कामगारांनी डॉक्टर सुजय विखे यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या माध्यमातून तनपुरे कारखाना सुरू करण्याबाबत प्रयत्न केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेल्या जिल्हा बँकेचे सहकार्याबद्दल यावेळी अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तनपुरे कारखान्याच्या विस्तारि कारणासाठी अंदाजे तीन कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच मिलचे विस्तारीकरण करून कारखान्याची गाळप क्षमता ३६०० ते ३८०० टनापर्यंत नेण्यासाठी मिलची दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी कामगार युनिवर सर्व वर्गांनी संमती देऊन तीन कोटी रुपये तसेच इतर कामगारांसाठी दीड कामगारांचे थकलेले पगार तुरी देण्यासाठी तरतूद करण्याचे आश्वासन खासदार सुजय विखे यांनी यावेळी दिले. असे साडेचार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी संचालक मंडळ यांनी यावेळी दाखवली. त्यामुळे संचालक मंडळांनी कामगारांच्या बाबतीत झुकते माप ठेवले आहे. तरीसुद्धा मागील वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीमुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे कारखाना बंद राहिला.
कामगारांचे पगार थकले. मात्र, यावर्षी कारखाना या दृष्टिकोनातून निश्चित बाहेर येईल अशी आशा व्यक्त करत कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी सभासदांनी बंद पडलेल्या कारखाना परिवर्तन पॅनल ला निवडून देऊन ताब्यात दिला. मागील वर्षी नवीन बॉयलर काढल्यावर चिमणीचे विस्तारीकरण करून कारखाना सुस्थितीत चालवू करण्यात येईल . कामगारांच्या पगार संदर्भात निश्?चित तरतूद केली जाईल. यावेळी चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे, यांच्यासह संचालक मंडळ कामगार युनिट चे पदाधिकारी कारखान्याचे प्रभारी एमडी सरोदे अधिकारी वर्ग आधी कामगार उपस्थित होते.