अहमदनगर : औरंगाबाद-मनमाड महामार्गाला जोडणाऱ्या वादग्रस्त तपोवन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. हे काम दर्जेदार करून घेणार असल्याचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी सांगितले.
तपोवन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात आली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर या याभागाचे नेतृत्व करतात. त्यांनी या कामासाठी पाठपुरवा केला. ठेकेदाराने तपोवन रस्त्याचे काम नव्याने करून देण्याची तयारी दर्शविली असून, भिस्तबाग महाल येथून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाची विरोधी पक्षनेते बारस्कर यांच्यासह नगरसेवकांनी पाहणी केली. नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर, नगरसेवक सुनील त्रिंबके, विनित पाऊलबुद्धे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे आदी उपस्थित होते. बारस्कर म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून तपोवन रस्त्याचे काम रखडले होते. त्यामुळे भागाचा दळवळणाचा प्रश्न गंभीर झला होता. हे काम मार्गी लावण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले. हा रस्ता पाईपलाईन रोडला पर्यायी रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. मनमाड महामार्ग ते औरंगाबाद महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे.
..
सूचना फोटो: ०८ तपोवन रोड नावाने आहे.