पाथर्डी : ॲड.प्रताप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शहरातील सुमन कोविड केअर सेंटरला पिंपळगाव टप्पा उपकेंद्रातील प्राथमिक शिक्षकांनी ५० हजार रुपयांचे साहित्य भेट दिले.
सुमन कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी घेतली जाणारी यथोचित काळजी व सेंटरमधील दाखल रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. समाजसेवेसाठी हातभार लावण्यासाठी पिंपळगाव टप्पा उपकेंद्रातील प्राथमिक शिक्षकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार, कोरोना रुग्णांसाठी लागणारी औषधे, तसेच वाफ घेण्याचे मशीन, मास्क, सॅनिटायझर, पल्स ऑक्सिमीटर व ५० पाणी बॉटल बॉक्स, असे पन्नास हजारांचे साहित्य सेंटरकडे सुपुर्द केले. यावेळी शिक्षक बाळासाहेब गोल्हार, रामदास दहिफळे, सुनील खेडकर, रामनाथ खेडकर, बाळासाहेब शिरसाट, नीलेश वराडे, शिवाजी ढाकणे, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, वैभव नागरे, गाडेकर, देवा पवार, योगेश रासने, बाळासाहेब ढाकणे आदी उपस्थित होते.