राज्य शिक्षक परिषदेचे नाशिक विभाग अध्यक्ष व प्रांत कार्यालय मंत्री सुनील पंडित यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना देण्यात आले. मागण्यांची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्राचार्य पंडित यांनी दिला. याप्रसंगी महानगर जिल्ह्याध्यक्ष सखाराम गारुडकर, ग्रामीणचे अध्यक्ष शरदराव दळवी, महानगर कार्यवाह गोविंद धर्माधिकारी, सुनील कुलकर्णी, बाबासाहेब बोडखे, विठ्ठल ढगे, सुभाष येवले आदी उपस्थित होते.
शिक्षकांनी आपापल्या शाळेतही निदर्शने केली. प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले. त्यावेळी प्राचार्य सुनील पंडित, उपशिक्षिका आशा मगर, सुषमा नगरकर, सुनील गाडगे, दिलीप रोकडे, अनिता सरोदे, जयमाला मोरे, प्रा. हर्षाली देशमुख, प्रा. गौतम कराळे, तसेच मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकांनीही काळ्या फिती लावून काम केले.
---------
फोटो - ०५शिक्षक परिषद
राज्य शिक्षक परिषदेच्या महानगर व ग्रामीण शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना निवेदन देण्यात आले.