सध्याचे वातावरण, विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता या सर्व घटकांवर शिक्षण अवलंबून असते. केवळ शिकविणे अपेक्षित नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे गरजेचे असते व शाळांमध्ये असे उपक्रम शिक्षक राबवितात. अशा प्रकारांतून विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी बनविणे आणि यासाठी एक सामान्य परीक्षा घेऊन शिक्षकांना वेतनवाढ देणे किंवा न देणे अत्यंत चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमधून व्यक्त होत आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची योजना शिक्षण विभागाने आखली आहे. परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार असून, त्यासाठी प्रणाली तयार करण्याच्या निविदा विभागाने मागवल्या आहेत. याला शिक्षक भारतीचा विरोध असून, वेतन वेळेवर न देणाऱ्या शासनाला शिक्षकांचे वेतन कमी करण्याच्या सूचनेला हा एक पर्याय असल्याचा आरोप शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, संभाजी चौधरी, नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, गोरखनाथ गव्हाणे, सोपानराव कळमकर, संजय भुसारी, शंकर भिवसने, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, महिला सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, संध्या गावडे, अनघा सासवडकर, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे आदींनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थ्यांच्या चाचण्यांवरून शिक्षकांचे मूल्यमापन नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:21 AM