अहमदनगर : समाजाला दिशा देण्याचे कार्य शिक्षक वर्ग करीत असून, समाजामध्ये शिक्षकांचे स्थान सर्वोच्च आहे. शिक्षकांनी घडविले म्हणून आम्ही घडलो. नगर शहरामध्ये शिक्षक भवनासाठी महानगरपालिकेमार्फत शिक्षक संघाला जागा देण्यात येईल. त्यासाठी शिक्षक संघटनेने पाठपुरावा करावा, असे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले.
नगर तालुका शिक्षक संघ व तालुका गुरुमाऊली मंडळातर्फे तालुक्यामधील विविध क्षेत्रांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा, तसेच पदोन्नती मिळालेले विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांचा येथील सरस्वती मंगल कार्यालयात आ. जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षक बँकेचे ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे, नगरसेवक सुवर्णाताई जाधव, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष साहेबराव आनाप, शरद सुद्रिक, संतोष दुसुंगे, शिक्षण विस्तार अधिकारी फणसे आदींची उपस्थिती होती.
जिल्हा संघाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी शिक्षक संघाला नगर शहरामध्ये शिक्षक भवनसाठी महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. त्यावर जगताप यांनी जागा देण्याचे आश्वासन संघाला दिले. माजी अध्यक्ष साहेबराव अनाप, कार्यक्रमाचे अध्यक्ष सलीमखान पठाण, बँकेचे अध्यक्ष राजू राहणे, राजकुमार साळवे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुका संघाचे अध्यक्ष महेश भणभणे व नारायण पिसे यांनी केले. सूत्रसंचालन सुजाता पुरी व रेवनाथ पवार यांनी केले. कार्यक्रमाला बाळासाहेब सरोदे, पी. डी. सोनवणे, बाळासाहेब सालके, विठ्ठल फुंदे, भाऊराव राहिंज, बाळासाहेब तापकीर, शकील बागवान, संतोष वाघमोडे, सरदार पटेल, राजू गायकवाड, चंद्रकांत बनकर, शाम पटारे, सुनील घोगरे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी बाळासाहेब चाबूकस्वार, रणजित कुताळ, नितीन पंडित, सविता गोरे, कविता हराळ, विजय नरवडे, गोरख तोडमल, किरण माने, राजू दुबे, सुजाता पुरी, संजय पवार, विजय नरवडे, बाळासाहेब कापसे, ऋषी गोरे, श्रीकांत दळवी, अच्युत घुले, संभाजी आढाव, गणेश शिंदे, दिलीप जाधव, संतोष गवळी, चंद्रकला कोतकर, आशिष मोरे, संतोष गव्हाणे, बापूसाहेब बोरुडे, शरद बोरुडे, भिवसेन हारदे आदींनी प्रयत्न केले.
०७ शिक्षक बँक