अहमदनगर : बजाज फायनान्समधून बोलत असून, तुम्हाला फिल्पकार्डकडून गिफ्टकार्ड मिळाले असल्याचे सांगत दोघा तरुणांची ५९ हजार रुपयांची आॅनलाइन फसवणूक करण्यात आली. १२ ते १३ एप्रिलदरम्यान ही घटना घडली.या प्रकरणी अनिल सूर्यभान तागड (वय २८, रा. शिलेगाव, ता. राहुरी) याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १२ एप्रिल रोजी तागड याला फोन आला. बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत गिफ्टकार्डची पुढील प्रक्रिया करण्यासाठी त्याने जन्मतारीख आणि बँक अकाउंटचा ओटीपी क्रमांक विचारून घेतला.त्यानंतर समोरील व्यक्तीने तागड याच्या बजाज फायनान्सच्या खात्यावरून २२ हजार २९० रुपयांची आॅनलाइन खरेदी केली. त्यानंतर दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून कोळपेवाडी (ता़ कोपरगाव) येथील सुनील नारायण मोरे यांनाही अशाच पद्धतीने फोन करून त्यांच्या बजाज फायनान्सच्या खात्यातून आॅनलाइन ३५ हजार ९९८ रुपयांचे प्रॉडक्ट खरेदी करून फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार पुढील तपास करत आहेत.आरोपी ‘तेच’ असण्याची शक्यताबजाज फायनान्स कंपनीतील ग्राहकांचा डेटा मिळवून त्यांची आॅनलाइन फसवणूक करणाºया टोळीचा महिनाभरापूर्वी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला असून, तिघांना अटक केली आहे. या तिघांनी जिल्ह्यातील २५ ग्राहकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तागड व मोरे यांची याच तिघांनी फसवणूक केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.