साहेबराव नरसाळेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाची तीन वेळा निवडणूक लढविलेले आणि कथा, कादंबरी, संशोधन, कृषी, पर्यटन अशा विविध विषयांवर ३५ पुस्तके लिहिलेल्या ज्येष्ठ साहित्यिक प्रा़ जवाहर मुथा यांच्याशी ‘मराठी वाचवा’ या लोकमतच्या अभियानाप्रसंगी साधलेला संवाद़़मराठी भाषेचे अध:पतन होतेय का?मराठी भाषेचे अध:पतन होतेय, हे खरे आहे़ कारण त्याला महाराष्ट्र शासनाचे धोरण कारणीभूत आहे़ त्याशिवाय मराठी भाषेविषयी अनास्था असलेले लोकं मराठी भाषेविषयी चुकीचे निर्णय घेत आहेत़ याचे एक उदाहरण मी येथे सांगतो, ‘मी जेव्हा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात मराठी शिकवीत होतो, तेव्हा १९७३-७४ साली त्याठिकाणी मराठी भाषा शिकविणे बंद झाले होते. त्यानंतर मी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार व मराठी विकास परिषद यांना पत्र लिहून मराठी भाषेवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली होती़ मराठी शिकविणे बंद करुन चालणार नाही, अशी रोकठोक भूमिका मी मांडली होती़ मराठी भाषा जर शिकवली गेली नाही तर शेतकऱ्यांच्या मुलांना अर्ज कसा करावा, हे सुद्धा माहिती पडणार नाही. मराठी भाषेचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होत आहे, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकली पाहिजे़ त्यासाठी महाराष्ट्राने मराठी आमची अस्मिता अशी चळवळच उभी करुन सर्व ठिकाणी मराठी सक्तीची करायला हवी़पाठ्यपुस्तकांमधील मराठी साहित्यही मराठीच्या अध:पतनास कारणीभूत ठरतेय का?आज पाठ्यपुस्तकांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे़ मराठी भाषा टिकवायची असेल तर पाठ्यपुस्तकांमधील साहित्य हे सहज, सुंदर आणि ओघवते असायला हवे़ त्याला ठसठसीत साहित्यमूल्य असावे़ दुर्दैवाने पाठ्यपुस्तकांमध्ये असलेल्याकविता, किंवा पाठ यांच्यामध्ये मराठी वाड:मयाच्या दृष्टिने काहीही मुल्य उरलेले दिसत नाही़महाराष्ट्रात मराठीची सक्ती असावी का?प्रश्नच नाही़ तरच मराठी टिकेल. प्रत्येक शाळेमध्ये मराठी हा विषय अपरिहार्य, सक्तीचा करणे अत्यंत आवश्यक आहे़ कारण पुढील काळात मराठी प्रमाण भाषेला अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये, मग ती इंग्रजी माध्यमाची असो किंवा उर्दू माध्यमाची असो, मराठी विषय सक्तीचाच असावा, असे माझे स्पष्ट मत आहे़ दाक्षिणात्य राज्यांमध्ये ते होऊ शकते, उत्तरेकडील राज्य हिंदीची सक्तीची करतात तर महाराष्ट्राची मातृभाषा आणि महाराष्ट्राचा गौरव असलेली मराठी सक्तीची का नको?दर्जाहीन व प्रमाणभाषेचा अभाव असलेल्या साहित्यांची पाठ्यपुस्तकांमध्ये रेलचेल दिसते़ हे फार दुर्दैवाचे आहे़ मराठी भाषा विकास समितीने त्यासंबंधी निर्णय घेतले पाहिजे. मराठी भाषा टिकवायची असेल तर सहज सुंदर आणि प्रमाणभाषेतील साहित्य पाठ्यपुस्तकांमध्ये असायला हवे़ आज पाठ्यपुस्तकांमधील साहित्याचा दर्जा घसरला आहे़ त्याला निर्णय प्रक्रियेतील उदासिनता जबाबदार आहे़ - प्रा़ जवाहर मुथा, ज्येष्ठ साहित्यिक