शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह जिहाद प्रकरणी अहमदनगरमध्ये ठाकरे गटाचे रास्ता रोको आंदोलन

By अरुण वाघमोडे | Updated: June 5, 2023 16:43 IST

आंदोलनादरम्यान वाहतूककोंडी होताच पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात आणले.

अहमदनगर: कर्जत तालुक्यातील लव जिहाद प्रकरणातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आल्याचा आरोप करत या  प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करून त्याच्यावर अपहरण व अत्याचाराचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत शिवसेनेच्या वतीने (ठाकरे गट) सोमवारी (दि.५) शहरातील डिएसपी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. 

आंदोलनादरम्यान वाहतूककोंडी होताच पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. यावेळी आंदोलकांनी पोलीस ठाण्यातही लव जिहाद विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरिश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लव जिहाद प्रकरणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कायदा करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या आंदोलनात जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, गौरव ढोने, उपशशहरप्रमुख अरुण झेंडे, संजय आव्हाड,  प्रशांत पाटील, भगवान कोकने, अशोक पारधे, गिरिधर हांडे, प्रतीक बोडखे, अमोल पडाले यांच्यासह  मोठ्या  संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. 

दरम्यान अपहरणानंतर अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांनी आरोपीच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आंदोलकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करून कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची नोंद करून काही वेळानंतर त्यांना सोडून दिले. 

टॅग्स :Love Jihadलव्ह जिहाद