रस्त्याचे काम निकृष्ट्र झाले असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. सरकारी पैसा वाया जाता कामा नये असे मत जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी व्यक्त केले.
ठाकर बाप्पा योजनेतून सावरगाव पाट ते ठाकरवाडी या रस्त्याचे काम सुरू आहे. ३५० मिटर लांबीचा खाडी-मुरमीकरण व डांबरीकरण सिलकोट असे ८.८० लाख रुपये किंमतीचा हा रस्ता होत आहे. ओबडधोबड खडी टाकून कसेबसे निकृष्ट दर्जाचे काम संबंधित ठेकेदार उरकत आहे. सावरगाव- ठाकरवाडी- समशेरपूर सीमा हा मूळ रस्ता वेगळा आहे. दर्जाहीन, सार्वजनिक बांधकामच्या गुणनियंत्रण विभागाकडे तक्रार केली आहे. ३५० मीटर लांबीचा ठाकरवाडी रस्ता असून गावचे सरपंच रस्त्याचे सुरू करताना उपस्थित होते.
......................
अंदाजपत्रक व निविदानुसार रस्त्याचे काम सुरू आहे. काम निकृष्ठ होत असेल तर चौकशी करू.
- एस.बी.सांगळे, शाखा अभियंता
..........
सावरगावपाटचा रस्ता मी सुचविला आहे. तक्रारदार हा आमचा बीजेपीचाच कार्यकर्ता आहे. मूळरस्ता वेगळा आणि झालेला रस्ता वेगळा असे होणार नाही. रस्त्याचे काम निकृष्ठ होत असेल तर त्यांची चौकशी झालीच पाहिजे. सरकारी पैसा वाया जाता कामा नये. ठेकेदाराची पाठराखण करणार नाही. गावकऱ्यांनी याबाबतीत मार्ग काढायला हवा आणि सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता अधिकारी यांनी जबाबदारीने कामाकडे लक्ष दिले पाहिजे, ती त्यांची जबाबदारी आहे.
- जालिंदर वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य
( १७अकोले रस्ता)