जामखेड (जि. अहमदनगर) : रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात तीन दिवसापासून विद्यार्थी शैक्षणिक, अर्थिक, शाररीक व मानसिक छळ होत असल्याने आंदोलन चालू होते. गुरुवारी रात्री उशिरा शिक्षण घेत असलेल्या एका मुलीच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गुरुवारी रात्री तीन मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून सलाईन देण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी सदर विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत दुसर्या दिवशी आमरण उपोषण चालूच ठेवले आहे. रत्नदीप मेडिकल फौडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या अन्याया विरोधात तीन दिवसापासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गुरुवार पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी सायंकाळी कर्जत उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या व इतर संघटनेच्या म्हणने ऐकून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात शारीरिक, अर्थिक, माणसिक व शैक्षणिक छळ होत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. उपविभागीय अधिकारी नितीन पाटील व पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी सदर बाब गंभीर असून याबाबत काय कारवाई झाली हे विद्यार्थ्यांना सांगितले तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे उपोषण व मुलींच्या तक्रारीसाठी महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली होती. रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या एका विद्यार्थीनीने भास्कर मोरे याच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भास्कर मोरे यांनी फिर्यादीस कॉलेजचे प्रिन्सिपल ऑफिस मध्ये बोलावून घेऊन सदर ऑफिसच्या अँटी चेंबर मध्ये फिर्यादीस लज्जा उपत्न होईल असे कृत्ये करतात. अश्लिल चाळे करतात. अशी फिर्याद दाखल केली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत. रत्नदीप मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पक्ष यांच्या सह सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.